वृतविश्लेषण: मारेगाव तालुक्याला खमठोक राजकीय नेतृत्वाची गरज

विकासापासून मारेगाव तालुका कोसो दूर

0
ज्योतिबा पोटे, मारेगाव: शंभरच्यावर गावं असलेला तालुका आणि डझनभर नेते मंडळी असूनही मारेगाव या आदिवासी बहुल तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्यसेवा आजारी अवस्थेत आहे. वणी, मारेगाव, झरी विधानसभा क्षेत्रात तीन आमदारच्या कारकीर्दीत गेल्या पंधरा वर्षांपासून मारेगाव जलकुंभाचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहे. असे एक ना अनेक समस्या मारेगाव तालुक्यात आहे मात्र इथल्या निष्क्रिय नेत्यांनी या बाबत कधी कठोर भूमिका घेतलेली दिसून येत नाह.
तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाल्यानं जनतेचे हाडे खिळखिळे झाले आहे. रोजगाराच्या दृष्टीने विचार केल्यास गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्यातील बेरोजगारांना एमआयडीसीचा बोर्ड वाकुल्या दाखविण्याचं काम करीत आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने येथे तीस वर्षांपूर्वी दूधडेअरी होती, शेतकऱ्यांच्या खिशात या जोडधंद्यातुन दोन पैसे पडत होते, पण ह्याच राजकीय नेत्यांच्या उदासिन धोरणाने ती दुधडेअरी कायमची बंद झाली. इथे असलेल्या लाखो रुपयांच्या शीतकरण मशिनी जागेवर सडत आहे. शेतक-यांच्या शेअरचे पैसे वाया गेले असून याला जबाबदार ईथले नेते असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.
निवडणुकीच्या काळात नेते मताचा जोगवा मागताना, आम्ही तालुक्याचे भाग्यविधाते आहो,या तोर्यात मत मिळविण्यासाठी एखाद्या गाव,पोडात एखाद्या शामराव, तुकारामभाऊच्या खांद्यावर हात ठेऊन खोटा विश्वास देऊन आश्वासनाची भलावण करतात. पाच वर्षांच्या कारकीर्दीत तालुक्याला नंदनवन करण्याच्या बाता मारणारे नेते, राजकीय सत्तेच्या  फायद्यासाठी कधी, कुठे अन् केव्हा कुणासोबत युती करेल याचा भरवसा जनतेला राहिला नाही. जनता आजच्या घडीला हुशार झाली असून, येना-या आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य तो धडा शिकवणार अशी चर्चा गावपातळीवर सुरू आहे. तर काही धूर्त मतदार थोड्या पैश्यासाठी मत विकत असल्याने खर्या अर्थाने तालुक्याच्या विकासाला खिळ बसण्याच्या कामाला मदत होत आहे,

(शेतात वीज कोसळून दोन महिला ठार) 

तालुक्याचा विकास जर तालुकावासियांना जर करुन घ्यायचा असेल तर तालुकावासियांनी नेत्यानांही समस्या साठी संघटीतपणे पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी विकास करणा-या निःस्वार्थी खमठोक राजकीय नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे. जेव्हा तालुक्याला खमठोक नेतृत्व मिळेल तो दिवस तालुक्यासाठी उदयाचा सूर्य घेउन येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.