नांदेपेरा येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी
जब्बार चिनी, वणीः नांदेपेरा येथे या वर्षी जानेवारीत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली. त्यातून सध्या भष्टाचार होत असल्याचा आरोप नांदेपेरा ग्रामवासियांनी केला. तसे निवेदन यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना दिले. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी ही मागणी या निवेदनातून केली आहे.
नांदेपेरा येथे 100 कॅन्स पाण्याची व्यवस्था असणारे हे यंत्र बसविण्यात आले. नंतर आमदारनिधीतून पुन्हा 100 कॅन्स वाढल्यात. या यंत्रात पैसे टाकण्याची व्यवस्था आहे. त्यात पैसे टाकले की, पाणी मिळतं. त्यातील जानेवारी ते मे 2020 पर्यंतची रक्कम पाणी पुरवठा योजनेच्या खात्यात जमा केलेली आहे. सप्टेंबर 2020पर्यंतची रक्कम खात्यात जमा न केल्याचा आरोप निवेदन देणाऱ्यांनी केला आहे.
पाण्याच्या मशीनद्वारे मिळणाऱ्या रकमेचा हिशेब ठेवला जात नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच काही कॅन्स ह्या परस्पर विकल्या जातात, असंही निवेदनात म्हटलं आहे. याची चौकशी व्हावी, ही मागणी करण्यात आली आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)