खासगी आरोप्लान्टमुळे कोडपाखिंडी गावाला पाणीटंचाई !

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगलाने व्यापलेल्या कोडपखिंडी गावाला एका खाजगी आरोप्लान्ट सुरू असल्यामुळे ग्रामवासीयांना पाण्याची झळ पोहचत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कोडपखिंडी येथील प्रभाकर जनार्धन कडू यांनी गेल्या एका वर्षांपासून खाजगी आरोप्लान्ट सुरू करून पाणी विक्रीचा व्यवसाय करीत आहे.

उन्हाळा लागल्यामुळे तसेच जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे याचा परिणाम गावातील नळयोजनेवर पडला आहे. प्रभाकर कडू यांनी दुसराही बोअर मारून पाणी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर मोठा परिणाम झाला आहे.

गावाला पाणी पुरवठा व्हावा या करिता सरपंच गंगाधर आत्राम यांनी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीर अधिग्रहण करून ग्रामवासीयांना पाणीपुरवठा करत आहे. उन्हाळा भर गावकऱ्यांना पाण्याची झळ पोहचू नये या करिता गावातील प्रभाकर कडू यांचा आरोप्लान्ट बंद करावे. आरोप्लान्ट चा पाणीपुरवठा बंद केल्यास ग्रामवासीया करिता पाणी वाचणार व उन्हाळ्यात पाण्याकरिता भटकावे लागणार नाही असे तक्रारीत म्हटले आहे.

सदर आरोप्लान्ट त्वरित बंद करण्याकरिता तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार एक आठवडा पुर्वी देण्यात आले. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने ग्रामवासियात संताप व्यक्त होत आहे. निवेदन देते वेळी सरपंच गंगाधर आत्राम, श्रीधर आगरकर, गणेश कुडमेथे, उत्तम गेडाम, प्रेमानंद भोयर, नितेश खडसे, पवन राऊत, अरविंद खडसे, रमाकांत गेडाम, सूरज मेश्राम, अंकुश आत्राम, अरुण गेडाम, वाल्मिक आत्राम इत्यादी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

झरी तालुक्यातील शिक्षक कोरोना लसीपासून वंचित

Leave A Reply

Your email address will not be published.