गाडी न दिल्याच्या रागातून सहकारी कर्मचा-याला मारहाण

वेकोलिच्या नायगाव खाणीतील घटना, मारहाण करणा-याविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: खाणीत जाण्यासाठी गाडी न दिल्याने चिडून एकाने ईपी फिटरला मारहाण केली. या मारहाणीत फिटर कड्याचा मार लागून जखमी झाला. वेकोलिच्या नायगाव खाणीत नाईट शिफ्टच्या वेळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या सहकारी कर्मचा-याविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Podar School 2025

फिर्यादी मतीन मेहबूब शेख (38) हा वेकोलिच्या नायगाव खाणीत काम करतो. तो वेकोलित ईपी फिटर या पदावर काम करतो. तो सुंदरनगर येथे राहतो. दिनांक 8 एप्रिल मतीनची नाईट शिफ्ट होती. रात्री 11 वाजता तो कामावर पोहोचला. त्याने एक्झावेशन सेक्शन येथून बोलेरो कॅम्पर ही गाडी आणली व शेडजवळ लावली. दरम्यान तिथे सुभाष खुटेमाटे (52) हा आला. त्याने मतीनला गाडी मागितली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यावर मतिनने मी खाणीत चाललो आहे. माझ्या सोबत चला मी तुम्हाला खाणीत सोडून देतो, असे म्हटले. मात्र गाडी न दिल्याचा सुभाषला राग आला. तो मतीनच्या अंगावर धावून गेला. दरम्यान घटनास्थळी हजर असलेले काही सहकारी मध्ये आले. त्यांनी दोघांची हातापायी सोडवली. मात्र सुभाष पुन्हा मतीनच्या अंगावर धावून गेला. दुस-यावेळी हातापायीत सुभाषच्या हातातील कडे मतिनच्या ओठावर लागले. त्यामुळे तिथून रक्त येऊ लागले.

त्यानंतर सुभाषने शिविगाळ करीत मतीनला जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी मतीनला त्याच्या सहका-यांनी घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले.  उपचार झाल्यानंतर दोन दिवसांनी मतीनने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी सुभाष खुटेमाटे विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1), 351 (2), 352 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.