झरी तालुक्यात अवैध धंद्याला ऊत, प्रशासनाचे दुर्लक्ष

परिसरात बडग्याची एकच चर्चा... वर्दीला पडला डाग...

0

सुशील ओझा, झरी: कोंबड्याचे प्रकरण ताजे असतानाच आता तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफवले असल्याने त्याकडे पोलीस विभागातील अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. मुकुटबन, अडेगाव, घोन्सा, खडकडोह, बोपापूर, तेजापूर, मांगली या गावात मोठ्या प्रमाणात दारूची अवैधरित्या विक्री सुरू आहे. तर मुकुटबन घोन्सा येथून सुगंधित गुटख्या विक्री व तस्करी होत आहे. मुकुटबन येथून अडेगाव मार्ग खातेरा, तेजापूर व गाडेघाट या घाटावरून कोरपना तालुक्यात दररोज लाखोंची दारू तस्करी केल्या जात असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

खाजगी सिमेंट कंपनी, डोलोमाईट, कोळसा खदाण, चुना फॅक्टरी येथील जड वाहतुक सुरू आहे. तसेच मांगलीतील पैनगंगा नदीतून तसेच रेल्वे पटरीने दररोज शेकडो जनावरांची तस्करी सुरू आहे. या सर्व अवैध धंद्याची परिसरातील सर्वांना माहिती असून पोलिसांनाच हे का दिसत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

ठाण्यातील बहुतांश कर्मचारी फक्त दारू तस्करी, गुटखा तस्करी, जनावर तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाही. तर काही कर्मचारी तर सिमेंट कंपनीत रात्री बेरात्री जाऊन त्यांच्या खाजगी चारचाकीने फिरतांना दिसत आहे.

ठाण्यातील कर्मचारी कुणालाही न जुमानता स्वतःच्या मर्जीने काम करीत असून सर्वच अधिकारी झाल्यासारखे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे ठाणेदार यांचे किती वचक आहे हे दिसून पडत आहे. आधीच बडगा पार्टीची खमंग चर्चा होत असताना परिसरात चालणा-या अवैध धंद्यामुळे खाकीला डाग पडताना दिसत आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.