तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सराठी येथील घटना, पंधरवड्यात चौथी आत्महत्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज संध्याकाळी एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सराठी येथे आजउघडकीस आली.

जीवन बंडू तुरणकार (31) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जीवन संध्या 5 वाजताच्या दरम्यान शेताकडे गेला. मात्र तो परत घरी आला नसल्याने त्याचा शोध घेणे सुरू केले असता जीवनचे मामा जगन भोगेकर यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह कुटुंबियांना आढळला.

जीवन याने कोणत्या कारणावरून आपले जिवन संपविले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटने मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जमादार चलाख, पो.शि.राजू टेकाम यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.

पंधरवड्यात आत्महत्येची चौथी घटना
मारेगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या लॉकडाऊन काळापासून आत्महत्येचे सत्र सतत सुरू आहे. 9 ऑगस्टला म्हैसदोडका, 19 ऑगस्टला घोडदरा, काल 20 ऑगस्टला मार्डी, तर आज 21 ऑगस्ट रोजी सराठी येथे आत्महत्येची घटना घडली आहे. या पंधरवड्यातील आत्महत्येची ही चौथी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.