साप्ताहिक आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग संपन्न
'धम्मपद - बौध्द साहित्यातील आविष्कार' या विषयावर मार्गदर्शन
विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी द्वारा मार्च 2017 पासून सतत दर शनिवार आणि रविवारी आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग घेण्यात येत आहे. सम्राट अशोक नगर वणी येथील बुध्दविहारात सकाळी 10.00 वाजता या संस्कार वर्गाला सुरूवात होते. या वर्गाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाते. तसेच युवकांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत आदर्श युवा पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे.
रविवार दि. 20 ऑगस्टला संस्कार वर्गात ‘धम्मपद – बौध्द साहित्यातील आविष्कार’ या विषयावर मार्शल मंगेश गवळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तत्पुर्वी संपूर्ण गाथांसहीत बुध्दवंदना घेऊन तथागत बुध्दाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्फूर्तीगीते गाण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन ऍड देवानंद भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार मार्शल स्वतेजा मस्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता धनश्री तेलंग, शितल चिकाटे, सम्रृध्द तेलंग, ईश्वर चिकाटेसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
(हे पण वाचा: स्वातंत्र्य दिनानिमित्य समता सैनिक दलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन)