विहिर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यायग्रस्त शेतकऱ्याची मागणी

अधिकारी, कर्मचाऱ्यांनीअनुदान हडपल्याचा आरोप

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बहुचर्चीत विहिर घोटाळ्याची चौकशी करावी. विहिर न खोदता विहिरीचे बिल पास करुन अनुदान हडपणारे अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी यांच्यावर मोका पाहणी अहवाल देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील मच्छिद्रा येथील शेतकरी अशोक मत्ते यांनी केली आहे.

रोजगार हमी योजनेतून मत्ते यांना विहिर मंजूर झाली आहे. त्याला 8-9 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पंचायत समिती मधील संबंधित अधिकारी, इंजिनियर, ठेकेदार यांनी संगणमत करुन विहिरीचे कोणतेही खोदकाम, बांधकाम न करता परस्पर बिल काढून रकमेची अफरातफर केली, हि बाब लक्षात येताच विहिर बांधकाम मोका पाहणी संबंधीचा अहवाल मिळावा यासाठी अशोक मत्ते यांनी आपल्या शेत गट नं.२/१ मधील मागणी अर्ज दि.२६/२/२०१८ व १७/४/२०१८ ला रितसर अर्ज करुन अहवाल मागितला. मात्र सदर शेतकऱ्याला कोणताही अहवाल मिळाला नसल्याचा दावा मत्ते यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर मत्ते यांच्या विहिरीची चौकशी करण्याचं पत्र त्यांना पं.स. कडून मिळालं. सदर विहिरीची चौकशी ११/५/२०१८ होणार हे निश्चित असताना पं.स मधून वेळेवर सदर शेतकर्याला दुरध्वनीवरुन आज काही कारणात्सव येऊ शकत नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामूळे तालुक्यातील विहिर घोट्याळ्याची चौकशी कधी होणार हा प्रश्न गुदस्त्यात आहे.

प्रशासकीय पातळीवर चौकशीला विलंब का होतो? अशा अनेक विहिरी तालुक्यात असल्याचे समोर येत असताना चौकशी वेळेवर न करणे म्हणजे दोषींना वाचविण्याचा प्रकार तर नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे. तर एवढे वर्ष लोटले असताना सदर शेतकरी आज पर्यत गप्प का होता हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.