“भाऊ, कधी सुरू होणार?” तळीरामांचा आर्त सवाल

सोशल मीडियावर विविध मॅसेजचा 'हँगओव्हर'...

0

जब्बार चीनी, वणी:  रेडझोन मध्येही मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून येत आहे. त्यामुळे मद्यशौकिनांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सध्या सोशल मीडियातून ‘तिन्ही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी’ अशा आषयाच्या बातमी शेअर करून “भाऊ, कधी सुरू होणार?” असा आर्त सवाल मद्यशौकिनांकडून विचारला जात आहे. सोमवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती असून. त्यामुळे तळीरामांचा लवकरच घसा ओला होण्याची शक्यता आहे. पुण्या-मुंबईत प्रतिबंधित क्षेत्र सोडून दारू विक्रीला परवानगी मिळाल्याने इतर भागातल्या मद्य शौकिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

मद्यविक्रीबाबत सरकारचा काय आहे निर्णय ?
दोन दिवसांअगोदर केंद्र सरकारतर्फे 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन 3.0 मध्ये ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस सशर्त परवानगी देण्यात आली. मात्र मद्यविक्री बंद असल्याने सध्या राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्र्यांनी तिन्ही झोनमध्ये मद्य विक्रीस परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यावरून केंद्र सरकारने तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय़ राज्य सरकारवर सोडला. त्यामुळे राज्यसरकार ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये सोमवारी मद्यविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेऊ शकते. सोमवारपासूनच ग्रीन झोनमध्ये सशर्त मद्यविक्री सुरू करण्याची परवानगी आधीच मिळाली आहे.

प्रातिनिधिक चित्र साभार

कुणाला राहणार मद्यविक्रीची परवानगी?
ग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या आणि स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना सोशल डिस्टनिंग म्हणजेच एकमेकांपासून 5 फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी 5 पेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. पण प्रतिबंधित झोनमध्ये मद्यविक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

‘वणी बहुगुणी’ने याबाबत उत्पादन शुल्क विभागाला विचारणा केली असता याबाबत अजुन सुचना आलेल्या नाहीत. मात्र बहुतेक सोमवारी काही आदेश येण्याची शक्यता आहे. असे काही आदेश आले तरी ते सशर्त असणार. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण मोहतकर यांनी दिली.

दारू विक्रेत्यांसह ग्राहकांमध्येही गोंधळ
दारू विक्रीला परवानगी मिळाली तर बारमध्ये बसण्याची परवानगी मिळणार का? जर बारमधून केवळ पार्सल सुविधा मिळाली तर त्याचे दर कमी होईल का? वणीत दोन वाईन शॉप असून दोन्हीही बाजारपेठेत आहेत त्यामुळे त्याला परवानगी मिळणार का? असे अऩेक प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला आहे.

सशर्त दारूविक्री करणे सोप्पी गोष्ट नाही – दारू व्यावसायिक
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सोपे असले तरी ग्राहकांची गरज बघून शॉपवर झुंबड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणीतील दोन्ही वाईन शॉप हे बाजारपेठेत असल्याने त्यावर पोलिसांचे पूर्ण वेळ संरक्षण मिळणे गरजेचे आहे. शिवाय माल संपल्यावर माल हा यवतमाळ वरून आणावा लागतो. यवतमाळ ही कोरोनाबाधित शहर आहे. त्यामुळे तिथून माल कसा आणावा? अशा एक ना अनेक अडचणी दारूविक्रीसाठी आहेत. अशी माहिती वणीतील एका दारू विक्रेत्याने ‘वणी बहुगुणी’ला दिली.

दारू विक्रीची राज्य सरकारने परवानगी दिली तरी त्याचा मोठा बोजा प्रशासकीय यंत्रणेवर पडणार हे निश्चित आहे. पण मद्यविक्री हे महसूलाचा महत्त्वाचा उगम असल्याने सध्याच्या परिस्थितीत कोरोनाशी लढताना दुसरीकडे महसूल गोळा होणे ही गरजेचे आहे. दारू सुरु करावी का? तसेच केली तर कशा पद्धतीने करावी यावर उद्या जिल्हा व राज्यपातळीवर बैठक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सोमवार मद्यशौकिनांसाठी आनंदाचा ठरणार का? हे आता उद्याच कळू शकेल.

सोशल मीडियावर मॅसेजचा ‘हँगओव्हर’
लॉकडाऊन 3.0 जाहीर झाल्यानंतर त्यात केवळ ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध मॅसेज आणि मीम्सची चलती होती. एका मीम्समध्ये ‘जर दारू प्यायची असेल तर घराबाहेर पडू नका, लवकर रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये या’ तर आणखी एका मीम्समध्ये ‘वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वणीत दारू सुरू करावी’ असे म्हटले आहे. तर त्यावर यानियमाने चंद्रपूरमध्ये दारूबंदी असल्याने वणीतही दारूबंदी होऊ शकते. असा युक्तीवाद करण्यात आला. यासह विविध मॅसेज दिवसभर फिरत होते. सध्या तिन्ही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

सोशल मीडियावरचे आणखी काही मॅसेजेस आणि मीम्स…

जिंदगी टमाटर सी हो गयी है……
पहले ग्रीन थे,
फिर ऑरेंज हुए
और आज रेड जोन में आ गए……
बस अब चटनी बनना ही बचा है।
???

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.