रानडुकराच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

कुंभा परिसरातील नगारा शिवारातील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: गावालगतच्या शिवारात पाळीव जनावरे चारायला गेलेल्या गुराख्यावर रान डुकराने हल्ला केला. कुंभा जवळील नगारा शिवारात ही घटना घडली. या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला आहे. वसंत महादेव मुरके वय 64 वर्षे, रा. कुंभा असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

वसंत हे मंगळवारी दि. 11 जानेवारीला दुपारी नेहमीप्रमाणे गावा लगत असलेल्या नगारा शिवारात पाळीव जनावरे चारायला गेले होते. तेथे जनावरे चारत असताना अचानक मागे झुडुपात लपून असलेल्या रान डुकराने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने गुराखी गोंधळून गेला आणि मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडू लागला.

या गुरख्याच्या ओरडण्याने शिवारातील लोक धावून गेली. तो पर्यंत गुराखी गंभीर जखमी झाले होते. उपस्थित लोकांनी गुराख्याला उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले. या हल्यात गुराखी गंभीर असल्याने उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वागदरा येथील तरुणाच्या दुचाकीला ट्रकची भीषण धडक

उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू…

 

Comments are closed.