भास्कर राऊत, मारेगाव: शेतात काम करीत असताना महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील वडगाव वाघाडी शिवारात दुपारी उशिरा ही घडली घडली. मृतकाचे नाव इंदूबाई मारोती हिंगाने (48) आहे. यात महिलाचा मुलगा मात्र काही क्षणाआधी घटनास्थळावरून दूर गेल्याने वाचला. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
इंदुबाई मारोती हिंगाने (48) यांचे कोलगाव लगत असलेल्या वडगाव वाघाडी येथे शेत आहे. मुलासह त्या शेती करायच्या. नेहमीप्रमाणे त्या शेतामध्ये निंदणीचे काम करीत होत्या. अशातच दुपारनंतर आकाशामध्ये ढग दाटून आले. पाऊस येईल असे वाटत होते पण पावसाची तेवढी दाहकता न वाटल्याने त्या शेतामध्येच काम करीत होत्या.
त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा हाही काम करीत होता. मोठ्या मुलाला तहान लागल्याने त्याने आईला सुद्धा पाणी प्यायला चाल असे म्हटले. पण मला तहान नाही तू पाणी पिऊन ये असे सांगितल्या घटनास्थळावरून मुलगा पाणी पिण्यासाठी गेला.
दुपारी 5 वाजताच्या दरम्यान ढग जास्त दाटून आले आणि एकाएकी वीज इंदूबाईंच्या अंगावर कोसळली. आईच्या अंगावर वीज कोसळल्याचे लक्षात येताच मुलगा धावत आला. आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा केले. आणि ऑटो बोलावून प्रथम वणी येथील खासगी दवाखान्यात नेले परंतु तिथे न घेतल्याने परत मारेगावला आणले.
मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी इंदूबाई यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. इंदूबाई यांच्या पतीच्या नावाने 4 एकर शेती असून अख्ये कुटुंब या 4 एकरावरच उदरनिर्वाह करीत होते. अशातच इंदुबाई यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. इंदूबाई यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. घटनेची मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: