विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचा मंगळावारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने तिच्या पतीसोबत येऊन वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता ही आपल्या कुटुंबासह गोकुळनगर येथे राहते. तिचे पती गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी पीडितेचे पती सकाळी 9 वाजता कामावर निघून गेले. पीडिता ही दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपल्या मुलासोबत अंगणात उभी होती. त्यावेळी समोरून राजू शिंदे (35) रा. गोकुळनगर हा तिथे आला व त्याने पीडितेच्या अंगणात येऊन त्याने विनयभंग केला.
पीडितेने विरोध करताच त्याने धक्का देऊन तेथून पळ काढला. त्याच्या धक्क्याने पीडिता ही खाली पडली व तिच्या डोक्याला दुखापत झाली. सायंकाळी पती आल्यानंतर तिने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. पती हा आरोपीच्या घराकडे जात असताना आरोपी राजू याने पीडितेच्या पतीला शिवीगाळ केली.
त्यानंतर पीडिता व तिच्या पतीने वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपी राजू शिंदे याच्याविरुद्ध कलम 354 (अ), 323, 504 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)