आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 800 च्या उंबरठ्यावर

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. यातील तीन रुग्ण हे आरटीपीसीआर तर 1 रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रुग्णांपैकी 3 रुग्ण वणी शहरातील असून एक रुग्ण उकणी येथील आहे. नवीन आलेल्या रुग्णांनुसार तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 792 झाली आहेत.

आज यवतमाळ हून 27 अहवाल प्राप्त झाले यातील 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात.  25 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात एक व्यक्ती पॉजिटिव्ह तर उर्वरित निगेटिव्ह आलेत. आज 18 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 41 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 792 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 752 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज एकही व्यक्ती कोरोनामुक्त झाली नाही. सध्या तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 17 जण होम आयसोलेट आहेत. 18 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 9 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

गोकुळनगर येथे महिलेचा विनयभंग

 

शुल्लक कारणावरून भावाला मारहाण: नगरसेवकावर गुन्हा दाखल

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.