विवाहितेचा विनयभंग, आरोपीला अटक

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वागदरा येथे राहणाऱ्या एका विवाहितेचा त्याच गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Podar School 2025

आरोपी नितीश माणिक पाझरे (45) राहणार नवीन लालगुडा हा किराणा दुकानाचा व्यवसाय करतो. गुरुवारी दुपारी पीडिता ही नितीशच्या दुकानात किराणा समान आणण्यासाठी गेली होती. यावेळी नितीशने तिला जाणीवपूर्वक हात लावला. यावेळी पीडितेने ही बाब कुणासही सांगितली नाही. त्यानंतर आरोपीची हिंमत वाढली व दुसऱ्या दिवशी आरोपी दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून थेट तिच्या घरी प्रवेश केला व त्याने पिडितेला शरीरसुखाची मागणी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेनंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. तिने घराशेजारील महिलांना एकत्रित करून शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाणे गाठले व पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीवर कलम 354 (अ), 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्रीच आरोपीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.