वीज तारांच्या स्पर्शाने कडबा भरलेल्या वाहनाला आग

अंदाजे तीन लाखाचे नुकसान, मोठी हाणी टळली

0
विलास ताजने, वणी:  कडबा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला वीज तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची घटना दि. ३१ रोज रविवारला दुपारी नायगाव येथे घडली. सदर घटनेत पिकअप वाहन मालक किशोर बोबडे यांचे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

 

वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथील किशोर बोबडे यांनी यात्रेतील व्यापाऱ्याला ज्वारीचा कडबा विकला होता. सदर कडबा स्वमालकीच्या ४०७ पिकअप वाहनात भरून दुपारी दोन वाजताच्या दरम्यान गावावरून वणीसाठी निघाले. सदर वाहन  विलास बोबडे  चालवीत होता. वाहन नायगाव गावात प्रवेश करताना लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांचा कडब्याला स्पर्श झाला. परिणामी कडबा पेटू लागला. ग्रामस्थांनी परिसरातील बोअरवेलच्या पाण्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र हवेचा प्रवाह जास्त असल्याने  आग आटोक्यात येणे कठीण झाले.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील वेकोलीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वणी नगर परिषदचेही अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते. सदर घटनेत वाहन मालकाचे नुकसान झाले. मात्र गावातील घरे आगीच्या विळख्यात आली असती तर प्रचंड नुकसान झाले असते. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.
लिंकवर घटनेचा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.