वणी (रवि ढुमणे): राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षीकांनी नामांकन प्राप्त केल्याने दोघींचा बोधी ट्री एज्युकेशन सोसायटीचे तथा गौरव प्रतिष्टान चे वतीने सन्मानचिन्ह देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय आयोजित निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील सुकनेगाव जिल्हा परिषद शाळेतील वसुधा ढाकणे व पळसोनी जिल्हा परिषद शाळेतील हर्षदा चोपणे(कुर्ले) या दोन्ही महिला शिक्षिकांनी यश संपादन करीत नामांकन प्राप्त करीत जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या 7 जानेवारीला बोधी ट्री एज्युकेशन सोसायटी तथा जीवन गौरव प्रतिष्ठान चे वतीने वसुधा ढाकणे व हर्षदा चोपणे यांचा सहकुटुंब शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post