आजपासून वणीत रंगणार महिलांचे आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल तुर्नामेंट

शासकीय मैदानावर रंगणार थरार, 12 तालुक्यातील 24 संघांचा समावेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शासकीय मैदान येथे आजपासून आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलिबॉल तुर्नामेंटचे सामने रंगणार आहे. यवतमाळ, मुळावा, बोरीअरब, उमरखेड, केळापूर, दारव्हा, घाटंजी, मारेगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, अमरावती येथील विविध महाविद्यालयातील सुमारे चोवीस व्हॉलीबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आज शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलिबॉल स्पर्धेचे (बी झोन) आयोजन लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे हस्ते होईल. यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांचेसह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे,अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, ओमप्रकाश चचडा, विनायकराव तत्त्वादी, सुरेश शुक्ल, माजी आमदार विश्वास नांदेकर, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर,जगदीश ठावरी, स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित राहतील.

या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेकरिता लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.उमेश व्यास, डॉ. मनोज जंत्रे, रूपेश पिंपळकर, जगदीश ठावरी, संतोष बेलेकर यांचेसह संस्कार व्हॉलीबॉल क्लबचे खेळाडू व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाचे विद्यार्थी परिश्रम करीत आहेत.

Comments are closed.