चला जादुच्या अद्भूत दुनियेत… वंडर वुमन आता वणीमध्ये

सुजाता टॉकीजमध्ये वर्ल्ड प्रेमियर

0

वणी बहुगुणी डेस्क: सुपर हिरो मुव्ही आवडत नसणारा क्वचितच प्रेक्षक असावा. आयर्न मॅन, बॅटमन, सुपरमन, स्पायडर मॅन, किंवा ऍव्हेंजर सिरिजमधले सुपरहिरो आपण बघितलेच असेल. यात भाऊगर्दीत केवळ एकच महिला सुपरवुमन आहे. ती म्हणजे वंडर वुमन. जिच्याकडे आहे एक चमकदार जादुई दोरी, एक ढाल आणि एक तलवार. त्याच्या जोरावर ही जगाचा सर्वनाश होण्यापासून बचाव करते.

2017 मध्ये वंडर वुमन सिरीजचा पहिला सिनेमा त्याच नावाने आला होता. त्याआधी बॅटमन वर्सेस सुपरमॅन- डॉन ऑफ जस्टिस या सिनेमात वंडर वुमन या सुपरहिरोची ओळख करून देण्यात आली होती. 2017 साली आलेला वंडर वुमन हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुस-या मुव्हीची आतुरतेने वाट बघत होते. अखेर 24 डिसेंबर रोजी या सिरिजचा पुढचा सिनेमा वंडर वुमन 1984 रिलिज होतोय. वणीतही सुजाता टॉकीजमध्ये हा सिनेमा हिंदी भाषेत रिलिज होतोय.

कोण आहे वंडर वुमन?
वंडर वुमन उर्फ डायना प्रिन्स ही एका अद्भूत बेटावर राहते व ती तिथली राजकुमारी आहे. हे बेट गुप्त आहे. शिवाय जिथे एकही पुरुष राहत नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांच्या बेटावर हल्ला झाल्याने ती तिचे अद्भूत बेट सोडते व महायुद्धापासून जगाला वाचवायला जाते. हे आपण वंडर वुमन च्या 2017 साली आलेल्या सिनेमात बघितलेच असेल.

वंडर वुमन (2017) हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उरल्याने या सिरीजच्या पुढच्या भागाची वंडर वुमन 1984 प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. हा आधीच्या मुव्हीचा स्टॅन्डलोन सिक्वल आहे. म्हणजे याचा आधी आलेल्या भागाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही सिरीजचा पहिला सिनेमा बघितला नसेल तरी हरकत नाही. हा सिनेमा पहिल्या सिनेमापासून पूर्ण वेगळा असला तरी याचा प्लाट तोच आहे. यावेळीही वंडर वुमन जगाला वाचवणार आहे.

ऍक्शन आणि स्पेशल इफेक्टने भरपूर असलेला हा सिनेमा आपल्याला एका जादुई दुनियेत घेऊन जाईल. हा सिनेमा आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत एकत्र बघता येईल. वणीतील सुजाता टॉकीजमध्ये गुरुवार दिनांक 24 डिसेंबरपासून हा सिनेमा आपल्याला पाहता येईल. 12, 3, 6 आणि 9 अशा चार शो मध्ये आपल्याला हा सिनेमा पाहता येईल.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येथे. व्हॉट्सऍपवरूनही (येथे क्लिक करा) तिकीट बुक करता येईल. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

लिंकवर क्लिक करून पाहा मुव्हीचा ट्रेलर…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.