वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू

बोटोणीजवळ भीषण अपघात, एक ठार तर एक जखमी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: त्यांच्या वडिलांवर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. यवतमाळ येथेच अंत्यसंस्कार असल्याने त्यांचा मुलगा भाच्यासह दुचाकीने यवतमाळ येथे गेले. मात्र अंत्यसंस्कार करून घरी पोहोचण्याच्या आधीच मुलावरही काळाने झडप घातली. वडिला पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास बोटोणीजवळ घडली.

सविस्तर वृत्त असे की वामन लोनबळे हे वणी जवळील चिखलगाव येथील रहिवाशी होते. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळलाच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. वडिलांच्या अंत्यसंस्काराची माहिती मिळताच वामन यांचा मुलगा सुरेश वामन लोनबळे (45) राहणार चिखलगाव हा त्यांचा भाचा महेश रमेश लोहबडे (35) राहणार चिखलगाव यांच्यासोबत यवतमाळ येथे दुचाकीने (MH 29-AR632) गेले.

दुपारी वडिलांवर अंत्यसंस्कार करून बुधवारी रात्री ते दोघेही मामा भाचे डबलसिट चिखलगावला परतत होते. दरम्यान  इंडेन गॅसचे सिलिंडर खाली करून ट्रक (MH04 EB 8132) यवतमाळच्या दिशेने जात होता. दरम्यान साडे नऊ वाजताच्या सुमारास बोटोणी जवळ असणा-या धाब्याजवळ या ट्रकने सुरेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात सुरेश लोहबडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाचा सुरेश हा गंभीर जखमी झाला. त्याचा दोन्ही पायाला जबर मार लागला. सुरेशची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

घटनास्थळावरून ट्रकचालक झाला फरार
अपघात होताच इंडेन गॅसच्या ट्रकचा चालक नंदकिशोर सुखदेव साबळे (31) राहणार बेलखेड ता. कारंजा जिल्हा वाशिम हा घटनास्थळावरून पसार झाला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून तो पांढरदेवीच्या जंगलात गेला असल्याची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ शोध घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले.

आज गुरुवारी चिखलगाव येथे सुरेश लोनबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलापाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिखलगावत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा:

चला जादुच्या अद्भूत दुनियेत… वंडर वुमन आता वणीमध्ये

हे पण वाचा:

वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी

Leave A Reply

Your email address will not be published.