पाटण: बोरी-पाटण-मुकुटबन रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम छोटे छोटे पुल बांधणीचे काम हाती घेण्यात आले. मात्र यातील अर्धे काम थंडबस्त्यात आहे. जिथे काम झाले तिथे मातीचा ढिगारा पसरवण्यात आला आहे. या डिगाऱ्यामुळे पावसाळ्यात सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो.
पुलाचे काम सुरू असल्याने शेतातून वळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु मृग नक्षत्र जवळपास येत असून ती रस्ते अजूनही जशाची तशी आहेत. याबाबत शेतकऱ्यांना विचारपूस केली असता याबाबत कुणीही लक्ष घालत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा: