कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

कृषी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन

0

जयप्रकाश वनकर, बोटोनी: मारेगावला तालुक्यातील बुरांडा (ख) येथे कृषी तंत्र निकेतन विद्यालय बुरांडा (ख) द्वारा कीटकनाशक फवारणी विषयक जागृती याबाबत आयोजन करण्यात आले. यवतमाळ जिल्हयातील मागील काही दिवसा आधी कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे झालेसे मृत्यु व विषबाधा या अनुशंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती.

जनजागृती कार्यक्रमात शेतकरी आणि शेतमजुरांना कृषी विद्यालयाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थांनी मार्गदर्शन केले.
कीटकनाशक फवारणी संबधी द्यावयाची काळजी व संरक्षीत कीटचा वापर कसा करावा यावर शेतकरी शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात आले.

कीटक नाशक परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. मुदतबाह्य झालेली कीटकनाशके खरेदी करू नये, बिगर नोंदनिकृत कीटकनाशक तसंचे त्यांच्या पॅकिंगवर केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदनी समिती यानी मंजुर केलेला सीआय आर क्रमांक व लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा त्रिकोन नसल्यास त्यांची खरेदी करू नये याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास बुराडा (ख) येथील सरपंच सौ सुंदर आत्राम, शिपाई भारत आत्राम, कृषी विद्यालयातील प्रा आकाश लालसरे, मोरे, काटकर , मंडाळी, येलेकार मॅडम, जुमनाके, उईके त्याच बरोबर विद्यार्थी आणि शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.