जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन
वणीतील ज्येष्ठ फोटोग्राफरचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त वणीतील बाजोरिया हॉलमध्ये नि:शुल्क फोटोग्राफरसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. वणी फोटोग्राफर एकता मंच तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील सुप्रसिद्ध व्हिडीओ एडीटींग मार्गदर्शक व रिल्स, लघुपट मार्गदर्शक समरेश अग्रवाल हे शिबिरार्थ्यांना मार्ददर्शन करणार आहे.
या शिबिरात शिबिरार्थ्यांना स्वत:चा कॅमेरा सोबत आणणे अनिवार्य आहे. शिबिरात मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धा देखील होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला रोख व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय वणीतील ज्येष्ठ फोटोग्राफर्सना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
वणी शहरातील तसेच वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील फोटोग्राफर्सनी फोटोग्राफी व व्हिडीओ एडिटिंग मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments are closed.