धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घाळणाऱ्या युवकास अटक

मुकुटबन मार्गावरील घटना

विवेक तोटेवार, वणी : धारदार तलवार हातात घेऊन रस्त्यावर दहशत पसरविण्याऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. समशाद शेख मुन्ना शेख (24) रा. राजूर (कॉलरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे.

मुकुटबन रोडवरील लखन बार समोर एक युवक हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पेट्रोलिंगवर असलेले पथकाने दुपारी 12 वाजता दरम्यान लखन बार समोरून आरोपीला शिताफीने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून निमुळत्या टोकाची धारदार तलवार जप्त केली.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (2) (3) अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. असे असतांना हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पो.ना. हरींद्र भारती करीत आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!