विद्यानिकेतन स्कूलमध्ये योग दिवस साजरा
रोहन आदेवार, मारेगाव: गुरूवार दि. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मारेगाव येथील विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कुल ऍण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी योग शिक्षक श्रीकांत काकडे आणि अमरजीत कळसकर यांच्या मार्गदर्शनात योगासनाचे प्रात्यक्षिके केले. मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बोंडे म्हणाल्या की योगा हा मानवाला केवळ शारीरिकच ऊर्जा नाही तर मानसिक ऊर्जा देखील प्रदान करतो. या ऊर्जेचे रूपांतर मन सुदृढ ठेवण्यास उपयुक्त ठरते. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक आजार निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडत आहे. नियमित योगसाधनेमुळे आजार दूर होतात. कार्यक्षमता वाढते, नवचैतन्य निर्माण होते. शारीरिक ऊर्जा वाढते व मानसिक संतुलन स्थिर राहते. यासाठी जीवणात योगसाधनेला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा संध्या पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग शिक्षक श्रीकांत काकडे व अमरजित कळसकर तसेच शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.