दुचाकी अडवल्याने विद्यार्थी जखमी

मेंढोली-शिरपूर रस्त्यावर घडला रात्री थरार

0

वणी – वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर एका मुलाची दुचाकी गावातीलच दोन तरुणांनी अडविली. त्यामुळे सदर विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथील निखिल दिवाकर पंधरे (18) हा विध्यार्थी चंद्रपूर येथे कॉलेजच्या कामाकरिता बुधवारला गेला होता. काम आटोपून परत येत असताना शिरपूर ते मेंढोली रस्त्यावर खडक्या नाल्यालगतच्या मार्गात रात्री 8 वाजताच्या दरम्यान मेंढोली येथील विठ्ठल मोहारे (35) आणि रवींद्र पाचभाई (28) हे दोघेही गाडीला आडवे आले. त्यामुळे निखिल दुचाकी वरून खाली पडुन जखमी झाला.

निखिलने स्वतःला वाचविण्यासाठी अंधारात पळ काढला. वडिलांना सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनी वरून दिली. निखिलला सोबत घेऊन सदर घटनेची तक्रार शिरपूर पोलिसात दाखल केली. शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.