मार्डाजवळील नदीतील डॅममध्ये उडी घेऊन दा़ंडगावच्या तरुणाची आत्महत्या

कर्जापाई आत्महत्या केल्याचा संशय, गावात शोककळा

0

भास्कर राऊत, मारेगाव: वर्धा नदीवर असलेल्या डॅम मध्ये उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव प्रफुल्ल गजानन मत्ते, वय अंदाजे 24 वर्षे असे आहेत. तो दांडगाव येथील रहिवाशी होता.

प्रफुल्ल हा बेरोजगार असल्याने काहीतरी उद्योग सुरू करावा म्हणून तुने ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर चालवण्याचे काम करीत होता. त्याच्या ट्रॅक्टरचे काही हप्ते थकीत होते. मागील वर्षी असलेले लॉकडाऊन आणि यावर्षीसुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून मिळत नसलेला नफा. आणि सोबतच ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या परतफेडीची चिंता यामुळे तो मागील अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. सोबतच घरी असलेल्या शेतीला पैसा लागत असल्याने वडिलांना वारंवार का पैसा मागावा म्हणून ती घरच्यांना याविषयी पैसे मागत नव्हता.

त्याचेवर ट्रॅक्टरचे जवळपास 1 लाख रुपयांचा हप्ता थकीत होता. ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या साठी त्याने कोणाकडूनतरी व्याजाने पैसे काढले होते. तेही देने बाकी होते. अशा विवंचनेत असलेला प्रफुल्ल तणावात होता. अशातच घरीसुद्धा तो जास्त जेवनसुद्धा करीत नव्हता. अशातच काल दि. 13 ऑगस्टला रात्रीचे 9 चे दरम्यान तो विमनस्क स्थितीत घराचे बाहेर गेला तो शेवटचाच. त्याचा मृतदेहच सकाळी गावाजवळ असलेल्या डॅममध्ये आढळून आला. प्रफुलच्या एकाकी एक्झिटने गावावर शोककळा पसरली आहे.

तो फोन शेवटचाच ठरला
प्रफुल्ल काही दिवसांपासून तणावात होता. घटनेच्या रात्री तो घरून निघून गेल्यानंतर मृतक प्रफुल्लच्या घरच्यांनी गोरज येथील पोलीस पाटील प्रमोद ताजने यांना फोन केला. त्यांनी थोडे प्रफुल्ल कडे लक्ष द्या. तो चिंतेत आहे. असे सांगीतल्यावर प्रमोद ताजने यांनी मृतक प्रफुल्ल याला फोन केला असता फक्त ऑल द बेस्ट आणि धन्यवाद एवढेच बोलला आणि फोन ठेवला असे पोलीस पाटील यांनी सांगितले. तो एवढा टोकाचा निर्णय घेईल याची कल्पनाच नव्हती असेही सांगीतले.

हे देखील वाचा:

15 ऑगस्ट निमित्त मयूर मार्केटिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा भव्य सेल

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी राखी सेलमध्ये होलसेल दरात राखी उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.