सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील तरुणाचा शेतात सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. तरुणावर 5 दिवस विविध ठिकाणी उपचार सुरू होता. अखेर गुरूवारी तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात 16 जानेवारीला संदीप अशोक निब्रड (30) हा आपल्या आई सोबत शेतात गेला होता. आई शेतात जनावरकरिता चारा गोळा करीत होती तर संदीप शेतातील दुसरे काम करीत होता. काही वेळाने संदीप देखील त्याच्या आईला मदत करण्यास गेला.
चारा जमा करीत असताना त्यांच्या पायाला सापाने अचानक चावा घेतला. सापाने चावा घेतल्याचे संदीपने आपल्या आईला सांगितले. थोडाही वेळ न दवडता संदीप याला मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला वणी येथे रेफर केले. मात्र संदीप प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले..
मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने चंद्रपूर इथून संदीपला नागपूर येथे रेफर केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होता. मात्र अखेर 21 जानेवारीला त्याची प्राणज्योत मालवली. संदीपच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. संदीप यांच्या मागे पत्नी, 5 वर्षाची मुलगी व विधवा आई असा आप्त परिवार आहे.
हे देखील वाचा: