भास्कर राऊत, मारेगाव: सवारीचे जेवण करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिविगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वरूड येथे घडली. या प्रकरणी शंकर रामदास खामनकर (30) जबर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. तक्रारीवरून आरोपी विनोद मारोती राजगडे (50) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी शंकर खामनकर (30) हे शुक्रवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी शंकर इंगोले यांचे घरी सवारीचे जेवन करायला गेले होते. त्या ठिकाणी आरोपी विनोद राजगडे (50) याने शंकरला शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंकर हा घरा समोरील सिमेंट बाकावर येऊन बसला. तिथे देखील आरोप पोहोचला व त्याने शंकरसोबत वाद घालीत त्याला जबर मारहाण केली.
या मारहाणीत शंकर खामनकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहे. तक्रारीवरुन आरोपी विनोद राजगडे याच्या विरोधात भादंविच्या कलम 307, 294, 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विनोद राजगडे याला अटक केली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.