फाशी घेतलेल्या व विष पिलेल्या तरुणाला मिळाले जीवदान
दोन्ही रुग्णांवर लोढा हॉस्पिटलमध्ये सुरु होता उपचार
जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यात एक फाशी घेतलेला तरुण व एक विष/डिझेल पिलेला एक तरुण असे दोन रुग्ण शहरातील लोढा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही तरुणांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. मात्र लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा, आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. सूरज चौधरी त्यांच्या टीमने या दोघांनाही वाचवण्यासाठी कसोशीचा प्रयत्न करून त्यांना जीवदान दिले. त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्या आठवड्यात मारेगाव येथील एक 30 वर्षीय तरुण याने विष व डिझेल पिले. तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने शहरातील लोढा हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. मात्र तरुणाची प्रकृती अतिशय गंभीर होती. डॉक्टरांनी त्याला लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. चार दिवसानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
दुसरी घटना वणीतील गोकुळ नगर परिसरातील आहे. येथील एका 32 वर्षीय तरुणाने घरी फाशी घेतील होती. फाशी घेतल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांना त्याला होत्या त्या परिस्थितीत तातडीने लोढा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तरुणाची परिस्थिती अतिशय गंभीर होती. डॉक्टरांनी त्याला तातडीने व्हेंटीलेटरवर ठेवले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात 5 दिवस उपचार करण्यात आला. सध्या त्या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दोन्ही घटनेतील रुग्ण सध्या धोक्याबाहेर असून त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांआधी शहारातील लोढा हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. डॉ. सूरज चौधरी तसेच विविध विषयातील स्पेशालिस्ट डॉक्टर अतिदक्षता विभागात सेवा देतात. हा विभाग सुरू झाल्यापासून नागरिकांना गावातच उपचार मिळत असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक गंभीर रुग्णांना उपचारामुळे जीवदान मिळाले आहे.
हे देखील वाचा:
50 एकरची झटका मशिन अवघ्या 7990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी
Comments are closed.