नंदीग्राम एक्सप्रेसखाली कटून तरुणीचा मृत्यू

तरुणी वणीतील रहिवासी, आत्महत्या की अपघात ?

विवेक तोटेवार, वणी: रेल्वेखाली कटून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 5 मे रोजी दु. सव्वा 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रश्मी धनराज पराते (20) रा. शास्त्रीनगर वणी असे मृतक तरुणीचे नाव आहे. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कळू शकले नाही. मात्र आजारपणामुळे त्रस्त झाल्याने रश्मीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृत रश्मी धनराज पराते ही शास्त्रीनगर येथे तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्या वडिलांची तहसिल कार्यलायाजवळ चहाची टपरी आहे. सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास रश्मी ही रेल्वे स्थानकावर आली. दरम्यान याच वेळी बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस अप डाऊन या दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्यात. यातील बल्लारशाह कडे जाणा-या नंदीग्राम एक्सप्रेसच्या खाली रश्मी आली. या अपघातात तिचे डोके धडापासून वेगळे झाले. अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात की आत्महत्या ?
प्रत्यक्षदर्शीच्या मते बल्लारशाह मुंबई एक्सप्रेस (डाऊन) ही गाडी येताच ती गाडीसमोर जाऊन उभी झाली. रश्मीची काही दिवसांपासून आजारी होती. तिच्या उपचार देखील सुरु होता. आजारपणामुळे तिचे वजन अत्यल्प होते. त्यामुळे ती मानसिक तणावात राहायाची. या आजारपणातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज सध्या बांधला जात आहे.

दरम्यान अपघात झाल्याचे कळताच बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे पराते कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

भरधाव कारने तरुणीला उडवले, तरुणी जखमी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.