गोडगावच्या गोड श्रेयाची श्रेयस कामगिरी, इथंही चॅम्पियन

शिष्यवृत्ती परीक्षेत आली पहिल्या क्रमांकावर, सर्वत्र कौतुक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण भागांतील प्रज्ञा आणि प्रतिभेला आजही चॅलेंज नाही. हे प्रज्ञावंत, प्रतिभावंत कोणत्याही उंचीवर जाऊ शकतात. हे गोडगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेच्या एका विद्यार्थीनीनं करून दाखवलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे जानेवारी महिन्यात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी श्रेया मंगेश गोवारदिपे अव्वल ठरली. शिष्यवृत्तीस पात्र ठरत तिनं गोडगाव शाळेच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा खोवलाआहे. एकेकाळी पटसंख्ये अभावी बंद पडणारी गोडगावची शाळा आज शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही अव्वल ठरली आहे. केंद्रात सलग दोनदा चॅम्पियन ठरली. जिल्हास्तरावर या शाळेनं सुवर्णपदकं व रोप्य पदक पदकं पटकाविलीत. खेळांसोबतच शैक्षणिक गुणवत्तेत अवल ठरल्याबद्दल श्रेयाचे अभिनंदन मुख्याध्यापक संतोष आसुटकर, स. शिक्षक ईश्वर राऊत, शाळा समितीचे अध्यक्ष अविनाश बोढाले, सविता चिव्हाणे, प्रवीण शेळकी, ज्योती गोवारदीपे, मंगेश कुमरे, सुधाकर बलकी, सचिन चंदनकर, वैशाली काळे, वैशाली कुमरे, सुनीता मते, वंदना मते, पोलीस पाटील रामप्रसाद गिरटकर तथा समस्त ग्रामवासीयांनी केले आहे.

Comments are closed.