जितेंद्र कोठारी, वणी: संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत मोठ्या भावाने या विरोधात वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादी विजय मत्ते यांच्या तक्रारी वरून त्यांचा लहान भाऊ पंकज मत्ते व त्याच्या पत्नी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांआधी फिर्यादीवर देखील अशीच तक्रार आरोपीच्या आईने केली होती.
तक्रारीनुसार, विजय वामनराव मत्ते (52) हे फर्निचरचा व्यवसाय करीत असून त्यांचे वरोरा रोडवर फर्निचरचे दुकान आहे. त्यांचे नागपूर येथे ही घर असून ते वणी व नागपूर येथे त्यांची येजा सुरू असते. आरोपी पंकज वामनराव मत्ते (45) हा त्यांचा लहान भाऊ आहे. वडिलांच्याी निधनानंतर विजय व पंकज यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू आहे. त्यातून त्यांच्यात अनेकदा वादावादी झाल्या आहेत.
दिनांक 19 जून रोजी विजय हे नागपूरहून वणीत आले. 24 जूनच्या रात्री ते घरी झोपून होते. दरम्यान रा. 2.30 वाजताच्या सुमारास त्यांना काहीतरी जळल्याचा वास आला. त्यांनी उठून खिडकीतून पाहिले असता त्यांच्या खोलीच्या दारावर आग लागलेली होती. दरम्यान या वेळी आरोपी पंकज व त्याची पत्नी अश्विनी मत्ते (40) हे त्यावेळी घटनास्थळी हजर होते. दरवाजाला आग लागल्याने विजय यांनी दरवाजा उघडला नाही व त्यांनी खोलीतून तातडीने पोलिसांना फोन लावला. दरम्यान पंकज यांच्या आईने ही आग विझवली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी याचे फोटो काढले. तसेच याबाबत तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर विजय बाथरूममध्ये असताना पंकज हा रुमच्या वर गेला व त्याच्या छताला ठोकले. त्यामुळे विजयच्या रुमचा स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. सातत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न व प्रॉपर्टीच्या वादातून नेहमी होणा-या शिविगाळमुळे विजय यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी पंकज वामनराव मत्ते व अश्विनी पंकज मत्ते या दोघांवर भादंविच्या कलम 341, 436, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आधी आरोपी पंकज यांनी काही दिवसांआधी विजय विरोधात तक्रार नोंदवली होती. प्ररकणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.