Birthday ad 1

दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या तरुणाला अटक

विदेशी दारूच्या बॉटल जप्त

0
veda lounge

जितेंद्र कोठारी, वणी: दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. दिनेश लक्ष्मण टेकाम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो माथोली येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून दारू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

शहरातील पंचशील नगर येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान 3.30 वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याच्या दुचाकीने (MH29 BR7601) ने जात असताना पोलिसांना आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे विदेशी दारूच्या बॉटल आढळून आल्या. ज्याची किंमत 5250 रुपये आहे.

Jadhao Clinic

पोलिसांनी दारू आणि दुचाकी असा एकूण 55 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 66 अ ई अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई सपोउ डोमाजी भादीकर व पोकॉ. संजय शेंदरे यांनी केली.

हे देखील वाचा:

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर सापडला मृतदेह

अखेर दीड महिन्यानंतर मृत्यूशी झुंज थांबली

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!