बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पुनवट येथील एका २१ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. तुषार श्यामराव मडावी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत काम करायचा. तुषार हा आपल्या घरी सायंकाळी कुलर लावत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तुषारचा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेजारच्या नागरिकांना कळली. मात्र तेव्हा तुषारचा मृत्यू झाला होता. याबाबत कुटुंबीयांनी शिरपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. शनिवारी सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.