ब्युटी पार्लर कोर्सचा मोफत डेमो क्लास रविवारी 28 एप्रिलला

तरुण-तरुणींसाठी रोजगाराची नवी संधी आपल्याच गावात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या रोजगारीचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यावर मात करण्यासाठी युवक-युवती धडपडत आहेत. मात्र वणी परिसरातील आणि ग्रामीण भागातील सगळ्यांनाच एक मोठी संधी चालून आलेली आहे. ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून ते आपले आयुष्य सुरू करू शकतात. म्हणूनच महाराष्ट्र बँक चौकातील डॉ. तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ ब्युटी पार्लरचे कोर्स सुरू झाले आहेत. यात युवा पिढिला घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्लॅमर मेकअप स्टुडिओमध्ये दिनांक 1 मे पासून नवीन बॅच सुरु होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी 28 एप्रिल रोजी मोफत डेमो प्रशिक्षण मिळणार आहे. एकदा मोफत डेमो क्लास करा आणि नंतर खात्री झाल्या नंतरच प्रवेश घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक युवक- युवती प्रतिभावंत आहेत. त्यांना गरज आहे एका योग्य संधीची. योग्य मार्गदर्शनाची. त्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यवसायात ते येऊ शकतात. थोडं फार प्रशिक्षण घेऊन आपल्या गावातच लेडीज हेअर कटिंग, फेशियल, ब्लिचिंग, क्लीनअप, मेहंदी आणि दुल्हन मेकअप करुन चांगली कमाई करता येते. वणी शहरात शिक्षणानिमित ग्रामीण भागातून येणाऱ्या किंवा शहरातील मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्स करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. येथील ग्लॅमर ब्युटी पार्लर व ट्रेनिंग सेंटर तर्फे ब्युटिशियन ट्रेनिंगची बॅच 1 मे पासून सुरू करण्यात येत आहे.

ब्युटी पार्लर कोर्स शिकणाऱ्या इच्छुक मुली व महिलांनी डेमो क्लासमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा. त्यानंतर ज्या मुलींना बेसिक व अडवांस कोर्स करायचा आहे, त्यांना 28 एप्रिल रोजी होणारा मोफत डेमो क्लास करून 1 मे पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण बॅचमध्ये भाग घेता येणार आहे. तरी ग्रामीण भागातील मुली व महिलांनी आपल्या स्वतच्या पायावर उभे राहण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन ग्लॅमर ब्युटी पार्लर व ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका प्रीती दरेकर हिने केले आहे. डेमो क्लास व ट्रेनिंगची अधिक माहिती करिता 9226337137 या नंबरवर संपर्क करू शकता.

Comments are closed.