मध्यरात्री शिरपूर रोडवर घडला थरार… गुंडांनी केले चालकाचे अपहरण

पोलिसांनी अवघ्या काही तासात आवळल्या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या

…आणि शिरपूर पोलिसांनी आवळल्या अवघ्या काही तासात मुसक्या….

विवेक तोटेवार, वणी: मोहदा येथे ट्रेलर खाली करून येत असताना वाहन चालकाला रस्त्यातच थांबवून बेदम मारहाण करत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर ट्रेलर मालकाला फोन करून पैशाची मागणी करण्यात आली होती. सदर घटना 24 सप्टेंबर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शिरपूर पोलिसांनी पाचही आरोपींच्या आज मुसक्या आवळल्या आहेत.

महताब शहाबुद्दीन अन्सारी (24) हे पोकलंड चालक असून ते अहमदनगर येथून मोहदा येथे आले होते. रविवारी मध्यरात्री ते पोकलंड (MH16 CV3208) मधला माल खाली करून परतत होते. दरम्यान 1 वाजताच्या सुमारास वेळाबाई फाट्यावर 5 लोकांनी त्यांना अडविले व त्यांना मारहाण केली. त्यानंतर ते पाचही जणांनी महताबचे अपहरण केले व त्यांना त्यांनी चालकाला वरोराकडे घेऊन निघाले.

अपहरण केल्यानंतर आरोपींनी चालकाच्या मालकाला फोन करून पैशाची मागणी केली. मात्र मालकाने आरोपींना प्रतिसाद दिला नाही. अखेर शेम्बळ फाट्याजवळ आरोपींनी चालकाच्या खिशातील 16 हजार रुपये काढून घेतले व ते वाहनातून बाहेर येऊन पसार झाले.

झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या महताब याने रात्रीच शिरपूर ठाणे गाठले व पाचही आरोपींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाच अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर पोलिसांनी रात्रीपासून तपासचक्र फिरविण्यास सुरवात केली.

आज 25 सप्टेंबर रोजी पाचही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. प्रशांत बबनराव सत्रमवर (40) भद्रावती, अनिल परशराम भवरे (49) रा. घाटंजी, दत्तात्रय रघुनाथ कांबळे (45) रा. घाटंजी, अनिकेत दशरथ भालेराव (27) रा घाटंजी, विवेक आनंदराव गेडाम (38) रा. भद्रावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी राम कांडूरे करीत आहे.

Comments are closed.