महसुल सप्ताह अंतर्गत लायन्स शाळेत ‘युवा संवाद’ कार्यशाळेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : लायन्स इंग्लीश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय वणी येथे दि. 2 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताह अंतर्गत ‘युवा संवाद’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी महसुल विभाग वणीचे निवासी नायब तहसिलदार विवेक पांडे यांनी शालेय जिवनात लागणारे कागदपत्र व दस्तावेज, अधिवास, राष्ट्रीयत्व, जात इत्यादी प्रमाणपत्राचे महत्व समजावून सांगितले. विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रीया सांगत कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शालेय परिसरात शिबीर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जयप्रकाश सुर्यवंशी यांनी नवीन मतदारांना मतदारयादीत नाव समाविष्ठ करण्या संबंधीचे महत्व व मतदार नोंदणीची प्रक्रीया सविस्तर समजावुन सांगीतली.

या वेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी महसूल विषयक नोंदी व यशस्वी लोकशाहीसाठी जागृत मतदारांची गरज यावर मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत मिळालेली माहीती विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व घटका पर्यंत पोचवावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला महसुल विभाग वणीचे निवडणुक विभाग अधिकारी व नायब तहसिलदार अशोक ब्राम्हणवाडे, सेवानिवृत्त न.प. मुख्याध्यापक दिनानाथ आत्राम, सुमित गावंडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिंग परिहार तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. लंकेश चुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.