जब्बार चीनी, वणी:शहरात ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे अशी गेल्या सहा महिन्यांपासून युवासेना मागणी करीत होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गेल्या आठवड्यात स्मरणपत्र देत तात्काळ काम न झाल्यास युवासेनेने सेनास्टाईल आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा शिवसेना प्रणीत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा यांनी दिला होता. अखेर प्रशासनाला जाग आली व गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
शहरातील ओव्हरलोड ट्रक व रस्त्यावर पडलेले खड्डे नगरपालिकेला दाखवण्यासाठी व त्या खड्यामुळे अपघात होऊ नये यासाठी लॉकडाऊनच्या काळात युवासेनेतर्फे अनोखं खड्डे रंगवा आंदोलन करण्यात आले होते. युवासेनेने शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लीतील रस्त्यावरील खड्डे पेन्टने रंगवून खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे व ओव्हरलोड वाहतुकीला लगाम लावावा अशी मागणी विक्रांत चचडा व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...
गेल्या आठवड्यात युवासेनेने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र देत रस्त्याचे काम न झाल्यास सेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला होता. अखेर प्रशासनाला जाग आली व दोन दिवसांपासून शास्त्री नगर ते सर्वोदय चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शहरातील इतर समस्याही सुटायला हव्यात: विक्रांत चचडा प्रशासनाने अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र केवळ खड्डे बुजवणे हा उपाय नसून ओव्हरलोड वाहतूक बंद होणे देखील गरजेचे आहे. युवासेनेने शहरातील अनेक ठिकाणचे खड्डे दाखवले होते. आता किती रस्त्यांचे काम पालिका प्रशासन करते याकडे युवासेनेचे लक्ष राहणार आहे. जर प्रशासनाने टाळाटाळ केली तर पुन्हा युवासेना मैदानात उतरेल. याशिवाय शहरातील इतर समस्या सुटणेही गरजेचे आहे. विक्रांत चचडा, युवासेना जिल्हाध्यक्ष
लॉकडाऊन काळातील युवासेनेचे खड्डा रंगवा आंदोलन
रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा विक्रांत चचडा, कुणाल लोणारे, बंटी सहानी, सौरभ खडसे, अनुप चटप, शुभम मदान, हिमांशू बतरा, ललित जुनेजा, आकाश उईके, बंटी येरणे, नीलेश खरबुजे व युवासेनेचे कार्यकर्ते यांनी केला होता.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.