अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीवर विविध गुन्हे दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: गावातील विहिरी वर पाणी भरण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील मानकी गावात शुक्रवार 15 जाने. रोजी सकाळी 10 वा. दरम्यान घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसानी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मानकी येथील 16 वर्षीय कुमारिका पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. दरम्यान गावातीलच प्रकाश अशोक चौधरी (वय 35) वर्ष यांनी तिला रस्त्यात अडवून तू मला आवडते असं सांगून तिचा विनयभंग केला. तसेच तिनं नकार दिल्यास एकाद्या दिवशी तुझी इज्जत काढतो. अशी धमकी दिली. आरोपीची वागणुकीमुळे घाबरलेल्यया मुलीनं पालकांसह वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

तक्रारीवरून वणी पोलिसांनी तात्काळ मानकी येथे जाऊन आरोपी प्रकाश चौधरी यास अटक केली. आरोपी विरुद्द कलम 354(अ)(1)(2), 354 (5) (1)(1) सहकलम 12 पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!