उपोषणकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

झरी नगरपंचायतविरोधात आंदोलक आक्रमक

0 192

सुशील ओझा, झरी : नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. नगरपंचायत अंतर्गत सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यावर नगरसेवकांसह नागरिकांचा आक्षेप आहे. सदर कामे करताना कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेतलेले नाही. अध्यक्षांनी कामात गौडबंगाल करून शासनाचा निधी लाटण्याचा उद्योग चालू केला असल्याचा आरोप नगरसेविका व काही महिलांनी केला. गेली चार दिवस याविरोधात आमरण उपोषण करण्यात आले.

मात्र, या उपोषणाची लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. अखेर उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, शांता जीवतोडे, महिला सेनेच्या संगीता घोडमारे, शीतल बुरोंदिया, विठ्ठल बोथाडे, संगीता कोडापे तालुका अध्यक्ष महिला सेना, इरफान सिद्दीकी, कवलदास कोडापे, शेषराव सोयाम, संगीता सोयाम, राजू शेख आदी उपस्थित होते.

Comments
Loading...