रोडरोमियोंचा बंदोबस्त करा, ठाणेदारांना निवेदन

रोडरोमियोंमुळे विद्यार्थीनी व महिला त्रस्त

0 836

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकता नगर परिसरात दिवसेंदिवस रोड रोमियोची संख्या वाढतच आहे. या रोमियोंना आळा घालण्याकरिता गुरुवारी 18 जुलै रोजी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर व कार्यकर्त्यांनी ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन देऊन या मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

शहरात वरोरा रोडवर स्थित एकता नगर परिसरात अनेक शिकवणी वर्ग चालतात. या शिकवणी वर्गात येणाऱ्या मुलींची छेड त्याच ठिकाणी चौकात उभे असलेल्या काही मुलांकडून काढली जाते. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला शिकवणी वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे रोज सहण करीत आहे. त्यामुळे अशा रोड रोमियोंचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांना रवि बेलूरकर यांनी निवेदनातून केली आहे.

निवेदन देतेवेळी रवी बेलूरकर यांच्यासह पंकज कासावार, कौशिक खेरा, अविनाश आवारी, सुरज निकुरे, प्रसन्न संदलावार, रोशन मोहितकर उपस्थित होते.

Comments
Loading...