झरी तालुक्यातील जनतेला महसूल विभागातर्फे सतर्कतेचा इशारा
अतिवृष्टी झाल्यास दक्षता घेण्याचे आवाहन
सुशील ओझा, झरी: नागपूर मौसम पूर्वानुमान केंद्र यांनी जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. या कालावधीत कोणतीही जीवहानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून जनतेने दक्षता घेण्याचे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. कोणत्याही अफवांर विश्वास ठेवू नये . खोट्या अफवा पसरवू नये. पावसामुळे मातीची घरे लवकर पडतात. अशा घरवाल्यांनी विशेष काळजी घ्यावी. पूरपरिस्थिमध्ये लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये. नदी-नाल्याला पूर आल्यास नदी-नाले ओलांडू नये. पूरपरिस्थितीमध्ये घरात पिण्याचे पाणी, सुखे खाद्यपदार्थ (शेंगदाणे, बिस्कीट, गूळ) साठा असावा. विजेच्या उपकरणाचा वापर करू नये किंवा विजेचा पुरवठा बंद करावा.
पुरपरिस्थितीत साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. पाणी उकळून प्यावे व अन्न झाकून ठेवावे. साथीच्या रोगांपासून संरक्षण प्राप्त झालेल्या औषधींचा योग्य वापर करावा. घरातील उपयुक्त समानासह उंच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्तीच्या प्रसंगी जवळील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाला जनतेनी संपर्क करावा.
नैसर्गिक वीज पडून होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्याकरिता घेण्याची दक्षता—–
घरात असताना वादळी वारा किंवा वीज चमकत असताना घ्यावयाचा दक्षता — घराच्या खिडक्या दरवाजे बंद करावे. खिडक्या दरवाजे व कुंपणापासून दूर राहा. मेघागर्जना झाल्यापासून अर्धा तास ३० मिनिटे घरातच रहा,
घराच्या बाहेर असल्यास——त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणी जावे, ट्रॅक्टर,शेतीचे अवजारे मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे. उघड्यावर असल्यास लगेच गुडघ्यावर बसून दोन्ही हाताने कान झाकावे व डोके दोन्ही पायाच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तशाच लटकत्या तारांपासून दूर रहावे,जंगलात असल्यास दाट लहान झाडाखाली उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.
वीज पडल्यास, वज्रघात झाल्यास—–
त्वरित रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवावे, वज्रघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या तसे व्यक्तीस हात लावल्यास धोका नसतो,ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या सौरक्षणात्मक थर ठेवावे,
काय करू नये—
गडगडाडीचे वादळ असल्यास, उंच जगावर,टेकडीवर, मोकळ्या जगावर ,समुद्र किनारी,स्वतंत्र झाडे,रेल्वे, बस ,साहिलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, वाहने व पाणी टाळावे.
घरात असल्यास घेण्याची काळजी——
वायरद्वारे जोडले गेलेले फोन/ मोबाईल व इतर इलेक्टिक / इलेक्ट्रनिक्स उपकरणे विद्युत जोडणीस लाऊ नये. वादळादरम्यान वीज चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये. या दरम्यान आंघोळ करणे हात धुणे कपडे धुणे करू नये. काँक्रीटच्या जमिनीवर झोपू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा, मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. तसेच इतर अनेक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.