फवारणीच्या विषबाधेने माथार्जुन व दिग्रस येथील आणखी दोघांचा मृत्यू

यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू

0

देव येवले, मुकुटबन: फवारणी करताना विषबाधेने मृत्यूमुखी पडण्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. माथार्जुन येथील गजानन हनुमन्तु नैताम (48) हे 11 ऑक्टोबरला फवारणी करताना अस्वस्थ झाल्याने त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती बघता त्यांना पांढरकवढा व नंतर यवतमाळला हलविण्यात आले मात्र 13 ऑक्टोबरला रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Podar School 2025

अशीच घटना दिग्रस येथे ही घडली मधुकर पोचिराम बावणे (38) यांना बुधवारी फवारणी दरम्यान विषबाधा झाली,  त्यांना सुरवातीला झरी व नंतर यवतमाळला उपचरासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. फवारणी दरम्यानच्या मृत्यूमुळे शेतकरी व शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.