विषबाधाने मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाखांची मदत

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कीटकनाशक फवारणी करत असताना विषबाधेतुन तालुक्यातील मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत मिळाली आहे. दिनांक 14 ऑक्टोबरला शनिवारी आमदर संजीवरेड्डी बोद्कुलवार यांचे हस्ते मृत शेतकरी पीसगाव येथील शंकर नागो आगलावे, घोड़दारा येथील दिवाकर तुळशिराम घागी व मारेगाव येथील शेतमजूर वसंता सिडाम यांच्या कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा होऊन तीन शेतकरी व एक शेतमजुराचा मृत्य झाला आहे. तर 70 च्या वर जणांना विषबाधा झालीये. या संपूर्ण घटनेने प्रशासन हादरून गेले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत शासन स्तरावरुन मृत शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांची मदत मृत शेतकरी कुटुबाला देण्यात आली.

या वेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार मारेगावचे तहसिलदार विजय साळवे, नायब तहसीदार गोहोकार, मारेगाव भाजपा तालुका अध्यक्ष शंकर लालसरे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावड़े, प्रशांत नगर उपाधक्ष नगर पंचायत मारेगाव गजाजन कनाके नगर सेवक, तालुका महामंत्री मंगेश देशपांडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.