सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने झरी वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
झरी नगरपंचायतीमध्ये 17 वॉर्ड असून गावाची लोकसंख्या सुमारे 2 हजार आहे. बसस्टँड, शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहे. तर अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले आहे. नालीत कचरा जमा झाला आहे. शहरात कचरा गाडी कधी येते तर तर कधी येत नाही. तसेच शहरातील नाल्या कागद कचरा तर पाण्याच्या प्लास्टिक बॉटलने भरल्या आहेत. नाल्या सफाई केल्या जात नसल्याने डासांचा प्रदर्भाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामवासियाना डेंग्यू, मलेरिया, ताप व इतर आजारांचा धोका वाढला आहे.
आधीच कोरोनाची महामारी सुरू आहे. त्यातच नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य धोरणामुळे ग्रामवासी नगरपंचायत विरुद्ध संताप व्यक्त करीत आहे. नगरपंचायतने उपाययोजना करून गावातील कचरा, नाल्या व रस्त्यावरील वाहणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी व जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवावी अशी मागणी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी केली आहे.
हे पण वाचा….
हे पण वाचा….