नियम ‘धाब्या’वर बसवून धाबा चालकांचा व्यवसाय सुरू

वणी-मुकुटबन, पाटण-अदिलाबाद रस्त्यावरील धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री

0

सुशील ओझा, झरी: वणी ते कायर, मुकुटबन, पाटण मार्ग आदीलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर धाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत आहे. कायर, नेरड, हिवरदरा, गणेशपूर, खडकी मुकुटबन व पाटण येथे मुख्य मार्गाच्या बाजूला असे धाबे सुरू करण्यात आले आहे. यातील अधिकाधिक धाबा चालकांकडे तर धाबा सुरू करण्याची कोणतीही परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे.

धाब्यावर जेवणाकरिता येणारे शौकीन हे दारू घेऊन येतात व धाब्यावरच दारूचे सेवन करताना दिसतात. तर काही धाबेचालक धाब्यावरच ग्राहकांना दारूची अरेंजमेंट करून देत आहेत. धाब्यावर राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री कधी बंद होईल असा प्रश्न विचारला जात आहे. याकडे पोलीस व संमधीत विभाग का दुर्लक्ष करीत आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे.

कोरोनासंबंधी शासनाची गाईडलाईन बसवली धाब्यावर…
जेवणाकरिता आलेल्या ग्राहकांना प्रवेश करण्याआधी सॅनिटायझर देण्यात यावे अशी सूचना आहे. शिवाय जेवणानंतर टेबल आणि खुर्ची सॅनिटाईज करणे बंधनकारक आहे. वेटरना आणि शेफना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे शिवाय टेबलमध्ये पुरेसे अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र धाबाचालकांनी कोरोनासंबंधी शासनाचे सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवले आहे.

विनापरवानगी धाबे सुरू…
कोणताही व्यवसाय करण्याकरिता परवाना प्राप्त करावा लागतो. त्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. तसेच ढाबा सुरू करताच संडास, बाथरूम, पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु अशी कोणतीही सुविधा एकाही ढाबा चालकाजवळ नसल्याची माहिती आहे.

या गंभीर बाबी कडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यांचा परवाना तपासणी करण्यात आली का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. तरी अनधिकृत सुरू असलेल्या धाब्याची तपासणी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी अपेक्षा परिसरातील सुजाण नागरिक करीत आहे.

हे पण वाचा….

आज तालुक्यात आढळलेत 2 पॉजिटिव्ह

हे पण वाचा….

रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.