आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

अचानक वाढला कोरोनाबाधितांचा आकडा

1

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील 6 कोरोनाबाधित आहेत. तर एक भालर कॉलनीतला आहे. वणीतील आनंद नगर 1, रवीनगर 1, टागोर चौक 1, आंबेडकर चौक 3 या प्रमाणे रुग्ण आहेत. शुक्रवारच्या तुलनेत हा आकडा अचानक वाढल्याचे दिसत आहेत.

तुलनेने कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. शनिवारी 52 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. तर पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट 03 जणांची झाली. 12 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 55 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 61 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 962 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 878 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. शनिवारी 11 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी झाली. सध्या तालुक्यात 61 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 32 जण होम आयसोलेट आहेत. 07 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 22 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज

गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी जास्त होत आहे. अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढते. याशिवाय शहरातीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी-जास्त होत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

नियम ‘धाब्या’वर बसवून धाबा चालकांचा व्यवसाय सुरू

हेदेखील वाचा

प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांना पितृशोक

 

Leave A Reply

Your email address will not be published.