सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत मधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये हेतुपुरस्पर विकासकामे होत नसल्याची तक्रार मुख्याधिकारींकडे करण्यात आली आहे. झरी ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर होऊन अडीच वर्ष लोटूनही एकही विकास कामे नाही तसेच अंतर्गत वादामुळेही विकास खुंटला आहे. अशातच वॉर्ड क्र १६ मध्ये रास्ता सोडा एक साधी नाली सुद्धा नसल्याने नागरिकांना पावसाच्या पाण्यामुळे घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे.
रस्ता कोणता नाली कोणती समजायला मार्ग नाही. पूर्ण वॉर्डात चिखलामय झाले आहे. शाळेतील लहान मुलांना घरापासून तर शाळेत सोडणाऱ्या बसपर्यंत पालकांना खांद्यावर बसून न्यावे लागत आहे. तर त्याच वॉर्डात एक अपंग मुलगी असून ती आठ दिवसांपासून चिखलामुळे घराच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे वॉर्डातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नगरसेवका विरुद्ध प्रंचड संताप व्यक्त होत आहे.
वॉर्डातील समस्या बाबत मुख्याधिकारी यांच्या कडे तक्रार केली असून सदर वॉर्डातील नगरसेवक यांना कामाबाबत विचारणा केली असता मला तुमच्या प्रभागासी काही घेणे देने नाही तसेच तुमच्या प्रभागात कोणतेही विकासकाम होऊ देणार नाही. तसेच इतर दोन कामे होणार होती त्या कामाचेही विरोध सभागृहात केल्याची तक्रारीत नमूद आहे.
नगरसेवकांच्या विकासकामांच्या विरोधामुळे वॉर्डातील विकासकामे करावे असा प्रश्न प्रभाग क्र १६ मधील जनतेला पडला आहे. तरी मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन प्रभागातील समष्याचे निराकरण करावे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा प्रहरच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी, संजय कोडापे, मारोती गाउत्रे, विक्रम संभे, सचिन पंधरे, नरेश डहाके, अशोक टेकाम, छत्रपती डहाके, विलास येरावार, गोपाल भौरवार यांनी दिला आहे.