झरी नगरपंचायतीच्या सभेवर नगरसेवकांचा बहिष्कार

मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचा मनमानी कारभार, विश्वासात घेत नसल्याचा आरोप

0

रफीक कनोजे, झरी: झरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमानी कारभार करतात तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता काम करतात, परिणामी झरी शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. शुक्रवारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि मुख्याधिका-यांवर आरोप करून नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला तसेच नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत तहसिलदार व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.

झरी तालुक्याची निर्मिती १९९२ मधे झाली. २५ वर्षानंतरही हा तालुका विकासापासून दुर आहे. झरी शहर विविध समस्येचं आगार बनलं आहे. इथे मरणानंतर अंत्यविधीला स्मशानभूमी नाही. बस शेड नाही. २ वर्षांपुर्वी इथे नगरपंचायतीची स्थापना झाली तरी सुद्धा येत्या २ वर्षात कोणतेही ठोस कार्य इथे घडले नाही.

मुख्याधिकारी हे मुख्यालयाला न रहाता अपडाउन करतात. त्यामुळे नगर पंचायतच्या विकास कामाकरिता त्यांना वेळ देता येत नाही. नगरपंचायतीला कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला आहे मात्र शहराच्या विकासाच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे नगरसेवक मतदाराना तोंड दाखवु शकत नाही अशी खंत व्यक्त करून संतापलेल्या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेवर बहिष्कार टाकुन नगराध्यक्षाना निवेदन दिले. ते निवेदन नगराध्यक्षानी खुर्चितच बसुन स्वीकारले त्यामुळे नगरसेवकात नाराजी चा स्वर उमटला. त्यानंतर नायब तहसीलदार खिरेकार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ज्योती बिजगुनवार, सुमन आत्राम, शांता जिवतोडे, सारिका किनाके, निर्मला कोडापे, कविता मोहीतकार, नंदा किनाके, विठ्ठल काटकर, सचिन पेंदोर आदि नगरसेवक उपस्थित होते

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.