झरी पंचायत समिती कार्यालयात अध्ययन व निश्चिती उदोधन कार्यशाळा
कार्यशाळेत तालुक्यातील शिक्षकांनी घेतले अध्ययन व अध्यापनाचे धडे
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावरून अध्ययन निश्चिती उदोधन कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती झरी येथील सभागृहात रविवारी करण्यात आले. ‘प्राथमिक शिक्षण हे विकासाचे लक्षण’ हा मानस ठेवून तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील झरी ,शिबला, माथार्जून, लिंगटी, मांगली,मार्की आणि सतपल्ली या आठ केंद्राअंतर्गत जिल्हा परिषद व माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा झाली.
अध्ययन निश्चिती उदोधन कार्यशाळा दरम्यान विद्यार्थ्यांना कसे घडविता येईल, व त्यांच्या समाविष्ट अध्ययनाने शाळांत विध्यार्थी कसे घडविले जातात यांसह शाळादरम्यान विद्यार्थांना विशिष्ट विषयाचे अध्यापन कसे करता येईल,अशा विविध विषया संदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात आले.
झरी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या अध्ययन निश्चिती कार्यशाळेत DIECPD यवतमाळचे प्राचार्य मिलिंद कुंबळे व जेष्ठ अधिवक्तते दिलीप मेश्राम, रमेश राऊत, प्रशांत शिर्से, जिल्हा समनव्यक निशांत परगणे, नंदकिशोर कडू, नागदिवे, भोयर सर (वि.स) तसेच झरी जामणी गटसंसाधन कक्षाचे साधनव्यक्ती गजानन आकुलवार, योगीराज दिघाडे, विजय सलार, कल्पना फटाले, मंगला मुंडाले, भीमराव टाकडे, अनिता महाजन आणि प्रशांत धुमणे यांनी मार्गदर्शन केले. तर तालुक्यातील सदर केंद्रातील शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित होते.